Sanjay Raut On Sharad Pawar's NCP Chief Step Down Decision: शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमागे घाणेरडे राजकारण... - संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत. असं म्हणत निर्णय मागे घेण्याचं अप्रत्यक्ष आवाहन केलं आहे.

Sanjay Raut , Sharad Pawar | (Photo Credit: ANI)

शरद पवार यांच्या आज अचानक झालेल्या  एनसीपी अध्यक्ष पदाच्या पायउतार होण्याच्या निर्णयाने धक्का बसला आहे.  एनसीपी पक्षातील नेते, कार्यकर्ते त्यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. पवारांच्या निर्णयामुळे एनसीपी पक्षासोबतच मविआ मध्येही खळबळ पसरली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी 'घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे.' असं म्हणत जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत. असं म्हणत निर्णय मागे घेण्याचं अप्रत्यक्ष आवाहन केलं आहे. Sharad Pawar यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर NCP कार्यकर्ते, नेते भावूक; तातडीने निर्णय मागे घेण्याचं भावनिक आवाहन (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now