अजित दादा आमचं ऐका.. नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीला गेले आहेत- संजय राऊत
मुख्यमंत्री आजच दिल्लीला गेले आहेत” असे सांगत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षाची फिरकी घेतली आहे.
“अजित दादा, आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल. मुख्यमंत्री आजच दिल्लीला गेले आहेत” असे सांगत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षाची फिरकी घेतली आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधकांकडून नेहमीच केली जाते. त्यावर राज्यातील महाविकासआघाडी सरकारला पुढील पाच वर्षे काहीच धोका नसल्याचे सत्ताधारी सांगतात. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे एका जाहीर कार्यक्रमात संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)