Thane Shahapur accident: शाहापुर दुर्घटनेत मृत मजूरांच्या कुटूंबीयांना केंद्राकडूून आणि राज्याकडून आर्थिक मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
Samruddhi Mahamarg Thane Shahapur accident: समुध्दी महामार्गावर ठाण्यातील शहापूर (Shahapur) येथे तिसऱ्या टप्प्याचं सुरळीत काम चालू असताना अचानक मजूराच्या अंगावर स्लॅब आणि गर्डर मशिन कोसळली. या दुर्घटनेत अद्याप 17 मजूरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे अंधाराच्या वेळीस बचाव कार्य घटनास्थळी दाखल झालं. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी या घटनेसंदर्भात शोकव्यक्त केला आहे. बचाव कार्याचे कामा अद्यापही चालू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यांची निश्चित संख्या सांगू शकत नाही.बचाव कार्याचे काम चालू असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या दुर्घटेत मयत झालेल्यांच्या कुटूंबाला मदत करण्यार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. प्रत्येक पाच लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या मजूरांना रुग्णासयात शासकिय खर्चाने उपचार दिले जाईल अशी माहिती देखील दिली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच दादा भूसे घटनास्थळी दाखल झाले आहे. मृत झालेल्या मजूरांना पंत प्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. आणि जखमींना ५० हजार रूपयांची मदत मिळेल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेचे शोक व्यक्त केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)