Samruddhi Mahamarg Phase 2: सुरु झाला समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा; CM Eknath Shinde यांची हस्ते शिर्डी ते भरवीर मार्गाचे उद्घाटन

पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आले होते. शिर्डी ते भरवीर हा मार्ग सुरु झाल्याने दोन्ही गावातील प्रवास 45 मिनिटात पूर्ण करणे शक्य होणार आहे.

Samruddhi Mahamarg Phase 2

मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी ते भरवीर या मार्गाचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या 701 किमी लांबीच्या द्रुतगती मार्गापैकी 80 किमीचा हा मार्ग शुक्रवारी उघडण्यात आला. आता भरवीर ते मुंबई दरम्यानचा फक्त 100 किमीचा भाग पूर्ण व्हायचा बाकी आहे. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आले होते. शिर्डी ते भरवीर हा मार्ग सुरु झाल्याने दोन्ही गावातील प्रवास 45 मिनिटात पूर्ण करणे शक्य होणार आहे. या मार्गावर 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3  पथकर प्लाझावर तीन इंटरचेंज आणि 56 टोल बूथ असतील. (हेही वाचा: Mumbai: मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा; अवघ्या 2.5 लाखात घर मिळणार, सरकारचा मोठा निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now