Kavathe Mahankal Nagar Panchayat 2022 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अभूतपूर्व यशावर रोहित पाटील यांनी वडील आर.आर.पाटील यांची आठवण काढत अशी दिली प्रतिक्रिया!
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत अवघ्या 23 वर्षीय रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे.
नगरपंचायतीच्या निवडणूकांमध्ये अनेकांचं लक्ष राज्याचे माजी गृहमंत्री, उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या लेकाकडे अर्थात रोहित पाटील कडे लागलं होतं. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर रोहितने आबांच्या समाधीस्थळाला भेट देत हा विजय सार्यांच्या एकत्र कामाचा असल्याचं म्हटलं आहे.
रोहित पाटील ट्वीट
कवठेमहांकाळातील सुजाण नागरिक, कार्यकर्ते मित्र, सहकारी, पत्रकार, राज्यभरातील हितचिंतक ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या निवडणूकीत मोलाची मदत केली त्या प्रत्येकांचा हा विजय आहे.
सर्वांचे पुनश्च आभार ! 🙏🏻
— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) January 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2022 01:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

