Lalu Prasad Yadav Arrived in Bengaluru: लालू प्रसाद यादव तेजस्वी यांच्यासह बंगळुरु येथील बैठकीस दाखल

RJD प्रमुख लालू प्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि पक्षाचे खासदार मनोज झा कर्नाटकातील बेंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पोहोचले. पाटणा येथे झालेल्या बैठकीतही लालू प्रसाद यादव यांचा सक्रीय सहभाग दिसून आला होता.

Lalu Prasad Yadav | (Photo credit: twitter)

RJD प्रमुख लालू प्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि पक्षाचे खासदार मनोज झा कर्नाटकातील बेंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पोहोचले. पाटणा येथे झालेल्या बैठकीतही लालू प्रसाद यादव यांचा सक्रीय सहभाग दिसून आला होता. खास करुन पाटण्यातील बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लालू प्रसाद यादव यांनी साधलेला संवाद आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घेतलेली फिरकी तेव्हा अधिक चर्चेत आली होती. आजच्या बैठकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप द्यायचा असल्याचे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement