Chhatrapati Sambhaji Raje: छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा, महाराष्ट्राच्या परिवर्तन क्रांतीची करणार सुरूवात
महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात करण्याची घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे.
राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मोठी घोषणा केली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात कुठल्याही पदावर छत्रपती नसलेत तरी छत्रपती संभाजीराजे राज्याच्या समाजकारणात कायम सक्रीय असतात. गडकिल्ले संवर्धनासाठी नुकतीच विशेष मागणी छत्रपतींनी शिंदे सरकारकडे (Shinde Government) केली होती. आता त्या पाठोपाठच महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात करण्याची घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिनी तुळजापूरला महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात होणार असं सुचक ट्वीट (Tweet) छत्रपती संभाजी राजेंनी केलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)