Revenue Department Employee Strike: महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांचा संप मागे; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मान्य केल्या प्रमुख मागण्या

मंत्री विखे-पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले.

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

महसूल कर्मचाऱ्यांच्या संप आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी संप थांबवण्याचे आवाहन करून, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे महसूल संघटनांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले. महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्वच जिल्ह्यातील 15 जुलैपासून हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. 11 जुलैला या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तर दुसऱ्या दिवशी लेखणीबंद ठेवून आंदोलन केले होते.

मंत्री विखे-पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले. मंत्री विखे पाटील यांच्या अश्वासनानंतर संप मागे घेतल्याचे महसूल संघटनांनी जाहीर केले. हेही वाचा: Maharashtra Cabinet Meeting Decisions: आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांना दहा लाख अनुदान; दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now