Republic Day 2023 Maharashtra Tableau: महाराष्ट्राच्या 'साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या विषयावरील चित्ररथाला प्राप्त झाला दुसरा क्रमांक
यावर्षी महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे 10 असे 27 चित्ररथ कर्तव्यपथावर दिसले.
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ति’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी झाला. यावर्षी महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे 10 असे 27 चित्ररथ कर्तव्यपथावर दिसले. आता माहिती मिळत आहे की, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक प्रपात झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)