Remarriage Not A Taboo: मृताच्या विधवेने पुर्नविवाह केला तरी नुकसानभरपाईसाठी पात्र - मुंबई उच्च न्यायालय

या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने सांगितले की विधवेने आयुष्यभर किंवा नुकसान भरपाई मिळेपर्यंत विधवाच राहणे हे अपेक्षित नाही आहे.

Bombay High Court (Photo Credit: PTI)

मोटार अपघातातील मृत व्यक्तीच्या विधवेला नुकसान भरपाई देण्याविरुद्ध विमा कंपनीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या महिलेने पुर्नविवाह केल्याने मोटार कंपनीने नुकसान भरपाई देण्यास मनाई केली होती. सखाराम गायकवाड यांचा रोड अपघातात मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनीने त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केले म्हणून नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने सांगितले की विधवेने आयुष्यभर किंवा नुकसान भरपाई मिळेपर्यंत विधवाच राहणे हे अपेक्षित नाही आहे. यामुळे सदर महिलेला भरपाईची रक्कम देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement