Reels Lovers सावधान! आगोदर नाशिक पोलिसांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहा
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी रिल्स बनवताना काहीसे भान ठेवा. पोलिसांची तुमच्यावर बारीक नजर आहे. वेळीच शाहणे व्हा नाहीतर एकदाका तुमच्यावर पोलिसांची नजर पडली आणि तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकलात की मग सुटका नाही.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या युवकांनो. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी रिल्स बनवताना काहीसे भान ठेवा. पोलिसांची तुमच्यावर बारीक नजर आहे. वेळीच शाहणे व्हा नाहीतर एकदाका तुमच्यावर पोलिसांची नजर पडली आणि तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकलात की मग सुटका नाही. नाशिक येथील एका तरुणास याची पुरेपूर प्रचिती आली आहे. नाशिक शहर पोलिसांनी या रिल्सबहाद्दराचा व्हिडिओही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. त्याला बेकायदेशीर रिल्सची हौस कराल तर... असे म्हणत कॅप्शन दिले आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक तरुण रिल्समध्ये धमकी आणि कायद्याचा भंग करणारी भाषा वापरतो आहे. पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. त्यानंतर मात्र हा तरुण माफी मगताना व्हिडिओ दिसतो. पोलिसांनी आधी आणि नंतर असे म्हणत दोन्ही व्हिडिओ शेअर केल आहेत.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)