Rape Accused Flees Police Station in Mumbai: बलात्कार आरोपी बाथरूम ला जाण्याच्या बहाण्याने पोलिस स्टेशन मधून पळाला; पोलिसांनी पुन्हा आवळल्या मुसक्या
बराच वेळ झाला पण आरोपी बाथरूम मधून येत नाही हे पाहताच पोलिसांनी आजुबाजुला शोधाशोध सुरू केली.
गोरेगाव (Goregaon) मध्ये एक बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी (Rape Case Accused) पोलिस स्टेशन मधून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार 19 फेब्रुवारी दिवशीची आहे. एका सहकाऱ्याने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. अमोल बोर्डे असे आरोपीचे नाव असून तो गोरेगाव पूर्व येथील रहिवासी आहे.
हिंदुस्तान टाईम्समधील वृत्तानुसार, अमोल बोर्डे यांच्या एका सहकाऱ्याने त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावले. रात्री 9.30 च्या सुमारास तो जेव्हा पोलिस स्टेशन मध्ये आला तेव्हा पोलिसांकडून FIR लिहण्याचं काम सुरू होतं. आरोपीवर section 376 (rape) चा गुन्हा दाखल केला जात होता.
जेव्हा हे घडत होतं तेव्हा आरोपीने वॉशरूमला जाण्याचा बहाणा केला. पोलिस स्टेशन मध्येच वॉशरूमला जाण्यासाठी पोलिसांनी त्याला परवानगी देखील दिली. पण पोलिसांच्या हातावर तुरी देत तो आरोपी पसार झाला होता. आरोपीला आपल्याला अटक होणार आहे हे लक्षात आलं तेव्हा त्याने पसार होण्याचा प्लॅन आखला.
बराच वेळ झाला पण आरोपी बाथरूम मधून येत नाही हे पाहताच पोलिसांनी आजुबाजुला शोधाशोध सुरू केली. पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यास सुरूवात केली आणि अखेर त्याला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आलं. नक्की वाचा: Buldhana Gang Rape: बुलढाण्यात आठजणांनी महिलेवर केला बलात्कार; आरोपी 45 हजार घेवून फरार, परिसरात खळबळ .
दरम्यान सध्या राज्यात कायद्याचा धाक राहिलाच नसल्याचा मोठा आरोप वारंवार विरोधकांकडून सत्ताधार्यांवर केला जात आहे. दिवसाढवळ्या खून, हत्या, जाळून ठार करण्याच्या घटना, गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)