Raj Thackeray On Heat Stroke: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यानच्या दुर्घटनेवर राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सल्ला
अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारला सल्ला देत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात नवी मुंबई येथे काल घडलेल्या दुर्घटनेवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठते आहे. अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारला सल्ला देत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. राज ठाकरे यांनी ट्विटर पोस्टच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारताना सल्ला दिला. आपण येथे वाचू शकता राज ठाकरे नेमके काय म्हणाले?
''काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे''.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)