Raj Thackeray: 'डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा', राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना अवाहन

सजक तरुणाने दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान यामुळे तरुणीचे प्राण वाचले. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या तरुणाचे कौतुक करत त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना अवाहन केले आहे.

Raj Thackeray | Twitter

पुणे येथे एका तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार झाले. सजक तरुणाने दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान यामुळे तरुणीचे प्राण वाचले. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या तरुणाचे कौतुक करत त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना अवाहन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून हे अवाहन करताना राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा'

राज यांनी पुढे म्हटले आहे की, ''काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.''

''दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी.''

''आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.''

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)