Raj Thackeray On Maharashtra NCP Crisis: महाराष्ट्रातील 'पॉवर' गेमवर राज ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया: म्हणाले, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला

अजित पवार यांच्या या निर्णयावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ' आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

Raj Thackeray On Maharashtra NCP Crisis: आज संपूर्ण महाराष्ट्राला मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या या निर्णयावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ' आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.'

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला आहे. (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली; संजय राऊत यांचा भाजपवर टीकास्त्र)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)