Maharashtra Political Crisis: भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली; संजय राऊत यांचा भाजपवर टीकास्त्र
अजित पवारांसोबत एनसीपीच्या 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला वर्षपूर्वी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. राजभवनावर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy CM Of Maharashtra) शपथ घेतली आहे. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसोबत एनसीपीच्या 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले "मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू." होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही. भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते. त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.
पहा ट्विट
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2023 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

