Raj Thackeray Aurangabad Rally: 'दुसऱ्या जातींच्याबाबतचा द्वेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतर सुरु झाला'; राज ठाकरेंचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र

शरद पवार यांनी पेरेलेले विष आता शाळा-कॉलेजपर्यंत पोहोचले आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेबद्दल उत्सुकता होती, आता ही सभा सुरु झाली आहे. सभेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी आपण अशा राज्यभर सभा घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरु केली. यावेळी ते म्हणाले, ‘शरद पवार यांनी जाती जातीत द्वेष निर्माण केला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचे राजकारण आणि द्वेष वाढला. शरद पवार यांनी पेरेलेले विष आता शाळा-कॉलेजपर्यंत पोहोचले आहे. ते पुढे म्हणाले, जेम्स लेनवरून पवारांनी 15 वर्षे राजकारण केले. पवार साहेब केंद्रात सत्तेत असताना त्यांनी जेम्स लेनला का फरफटत आणले नाही? बाबासाहेब पुरंदरे हे ब्राह्मण होते म्हणून शरद पवार यांनी त्यांना त्रास दिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement