रायगड किल्ला सात डिसेंबरपर्यंत राहणार पर्यटकांसाठी बंद, रायगड पोलिसांची माहिती
राष्ट्रपतींच्या दाै-या निमित्त तीन ते सात डिसेंबर या कालावधीत किल्ले रायगडावर Raigad fort पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
स्वराज्याची राजधानी रायगड (Raigad) किल्ल्यास भेट देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोंविद (Ram Nath Kovind) हे येत्या सात डिसेंबरला येणार आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून हे सांगण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ काेविंद हे किल्ले रायगडावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. दरम्यान राष्ट्रपतींच्या दाै-या निमित्त तीन ते सात डिसेंबर या कालावधीत किल्ले रायगडावर Raigad fort पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
किल्ले रायगड, रायगड रोप-वे व रायगड किल्ल्याच्या आजूबाजूकडील परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव दि. ०३ ते ०७ डिसेंबर या कालावधीत पर्यटनाकरिता बंद राहणार आहे....#किल्ले_रायगड pic.twitter.com/zQ4IaNYMpz
— Raigad Police (@RaigadPolice) December 1, 2021
राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.@rashtrapatibhvn
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 25, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2021 08:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

