Rahul Gandhi with Sonia Gandhi: राहुल गांधी यांचे मातृप्रेम; सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधतानाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल
काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभर भ्रमण करत आहेत. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या भाषणाचे विविध पैलुंचे दर्शन घडवणारे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. आताही राहुल यांचा असाच एक फोटो काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभर भ्रमण करत आहेत. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या भाषणाचे विविध पैलुंचे दर्शन घडवणारे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. आताही राहुल यांचा असाच एक फोटो काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्या फोटोत राहुल गांधी आपल्या मातोश्री आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या फोटोला 1,564 पेक्षा अधिक लोकानी रिट्विट केले आहे तर 108 युजर्सनी प्रतिक्रियेसह हा फोटो रिट्विट केला आहे. अवघ्या काहीच वेळा या फोटोला 8,532 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. लाईक शेअर आणि कमेंट अद्यापही सुरुच आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)