Koyata Gang: पुण्यातील कोयता गँग गुन्हेगारीचे अहमदनगरमध्येही दर्शन, तरुणाला धमकावत जबर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

कोयता गँग गुंडांची दहशत पुणे शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. हाच प्रकार आता अहमदनगर येथेही घडू लागल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तरुणांची एक झुंड हातात कोयता आणि लाकडी दांडके घेऊन तरुणाला बेदम मरहाण करताना दिसत आहे

Koyata Gang | (Photo Credit - Twitter)

कोयता गँग गुंडांची दहशत पुणे शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. हाच प्रकार आता अहमदनगर येथेही घडू लागल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तरुणांची एक झुंड हातात कोयता आणि लाकडी दांडके घेऊन तरुणाला बेदम मरहाण करताना दिसत आहे. ही घटना एका दुकानासमोर घडत असून ती सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. हा व्हिडिओ अहमदनगर येथील असल्याचा दावा केला जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement