Pune Train Accident: पुण्यात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तरुण प्लेटफॉर्म आणि रूळांमध्ये अडकला, सुरक्षा रक्षकाने वाचवला जीव ( Watch Video)
अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. उद्यान एक्स्प्रेस ट्रेन पकडताना तरूण खाली पडला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे तरूणाचे प्राण वाचले.
Pune Rail Accident: पुण्यातील एका रेल्वे अपघाताचा (Pune Train Accident) भयानक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या 10 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक तरूण धावत्या उद्यान एक्स्प्रेस (Udyan Express) ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. पण ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला. त्यानंतर तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. त्याला वाचवण्यासाठी एक सुरक्ष कर्मचारी तत्परता दाखवत लगेच तिथे पोहोचला. त्याने तरुणाला पटकन स्वतःकडे ओढतो आणि वाचवले(Save Passenger). (हेही वाचा: Stunt Viral Video : पोलिसांसमोर स्टंटबाजी नडली, पुढचं चाक उचलून बाईक पळवली...व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूणावर कारवाई)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)