Pune Traffic Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पूणे दौऱ्यावर, पुण्यातील वाहतूकीत केले 'हे' बदल, पुणे ट्राफिक पोलिसांनी दिली माहिती
त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहे.
Pune Traffic Update: पुणे (Pune) शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम 1 ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागात आयोजित करण्यात आल्याने त्यानुसार आवश्यक वाहतूक बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. ते तात्पुरत्या स्वरूपात बदल करत सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत लागू होतील. दरम्यान, पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, एसजी बर्वे चौक, गाडगीळ पुतला चौक, बुधवार चौक, सेवा सदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोडवरील वाहतूक व्यवस्था बदलणार आहे. सुरक्षेतेच्या कारणस्तव वाहतूकांमध्ये बदल करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या मार्गांचा वापर टाळून गैरसोय टाळण्यासाठी अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. पुणे पोलीसांचा ही कडक बंदोबस्त असणार आहे. वाहनचालकांच्या सोयी नुसार हे बदल करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)