Pune Traffic Update: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त 29 मार्चला शिरूर तालुक्यात वाहतुकीमध्ये बदल
संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर 29 मार्च दिवशी हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी देखील होणार आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj)
यांची 336 वी पुण्यतिथी 29 मार्च दिवशी आहे. तिथीनुसार, संभाजी महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन अमावस्येला असते. त्यामुळे पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त येतात. या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र वढू बुद्रुक मध्ये वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना या वाहतूक व्यवस्थेतील बदलानुसार तुमचा कार्यक्रम आखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर 29 मार्च दिवशी हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी देखील होणार आहे.
शिरूर तालुक्यात वाहतूकी मध्ये बदल
श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वाहतुकीत बदल pic.twitter.com/7ekGunAclY
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) March 27, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2025 01:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

