Pune to Katraj Road Transport: पुणे ते कात्रज रस्ता एकेरी वाहतूक करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करुन वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

Road | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Pune to Katraj Road Transport: पुणे ते कात्रज रस्ता (जुना कात्रज घाट रस्ता) एकेरी वाहतूक करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश. ३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करुन वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ (जुना कात्रज घाट रस्ता) कि.मी. २२/०० ते २०/२०० या लांबीत घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी टाळणे व अपघात होऊ नये यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत. (हेही वाचा - Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे हायवे वर 3 ट्रकचा अपघात; एक कंटेनर 100 फूट दरीत कोसळला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now