Pune: पुण्याच्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे नाव गुगल मॅपवर 'छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' असे बदलले; बाणेर पोलिसांत तक्रार दाखल
अशा प्रकारे गुगल मॅप लोकेशन एडीटचा वापर करुन, तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन काही समाज कंटकांकडुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल हे गुगल मॅपवर 'छत्रपती औरंगजेब आलमगीर क्रीडा संकुल' म्हणून सूचीबद्ध असल्याचे आढळून आले आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते यांनी शुक्रवारी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत बालवडकर यांनी सोशल मिडियावर माहिती दिली. ते म्हणाले, ‘पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे नाव काही समाज कंटकांनी गुगल मॅपवर ‘छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ असे बदलल्याचे निदर्शनास आले. तसेच याबाबतच्या अनेक तक्रारी शिवप्रेमी, खेळाडू, ग्रामस्थ व नागरिकांनी केल्या. याबाबत तातडीने बाणेर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.चंद्रशेखर सावंत यांना भेटून याबाबतची लेखी तक्रार पत्राद्वारे दिली.’
ते पुढे म्हणतात, ‘अशा प्रकारे गुगल मॅप लोकेशन एडीटचा वापर करुन, तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन काही समाज कंटकांकडुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. तरी अशा विकृतींना (दोषींना) तातडीने शोधून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.’ (हेही वाचा: Mumbai Shocker: संतापजनक! लोकल ट्रेनमध्ये वादानंतर पुरूष प्रवाशाकडून महिलेला बेदम मारहाण)
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे नाव गुगल मॅपवर 'छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' असे बदलले:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)