Pune Smoke Emanating From Sedan Car: पुण्यात उलटलेल्या टँकरच्या समोरच सेडान कारच्या इंजिनमधून निघू लागला धूर; वडगाव शेरी चौकात भीतीचे वातावरण

पोलिसांनी गाडीतील चार जणांना बाहेर येण्यास सांगितले व अग्निशमन दलाने काही मिनिटांतच धूर आटोक्यात आणण्यासाठी इंजिनवर जेट फवारणी केली.

पुण्यातील वडगाव शेरी येथे पहाटे 3 च्या सुमारास रिलायन्स कंपनीचा गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना समोर आली होती. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली होती. आता या उलटलेल्या टँकर समोरून येणाऱ्या सेडान कारच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे समोर आले आहे. यामुळे वडगाव शेरी चौकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. येरवड्याहून वाघोलीच्या दिशेने जाणाऱ्या एका सेडान कारच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्याने ही कार अचानक आयबीस हॉटेलजवळ थांबवण्यात आली. त्यानंतर तातडीने याची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला देण्यात आली. पोलिसांनी गाडीतील चार जणांना बाहेर येण्यास सांगितले व अग्निशमन दलाने काही मिनिटांतच धूर आटोक्यात आणण्यासाठी इंजिनवर जेट फवारणी केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, कार जास्त तापली होती ज्यामुळे धूर निघून घबराट निर्माण झाली. आधीच गजबजलेल्या वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून सेडान सुरक्षित अंतरावर नेण्यात आली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now