Pune Shocker: पुण्यातील रावेत परिसरात लोखंडी होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग पडले व त्याखाली दबून या पाच जणांचा मृत्यू झाला.
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे लोखंडी होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत किवळे परिसरात हा लोखंडी होर्डिंग बोर्ड कोसळून चार महिला आणि एका पुरुषासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग पडले व त्याखाली दबून या पाच जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी या होर्डिंग खाली हे लोक आश्रयाला उभे होते. (हेही वाचा: New Mumbai: सानपाडा येथे ट्रकने धडक दिल्याने सायन येथील रहिवाशाचा मृत्यू; चालकाला अटक)
पहा व्हिडीओ-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Music Teacher Accident: प्रसिद्ध संगीत शिक्षकाचा अपघाती मृत्यू; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दुर्घटना
Black Magic For Sex: लैंगिक संबंधांसाठी काळी जादू, लिंबाचा वापर; पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल
Ghatkopar Hoarding Collapse Case: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपी अर्शद खानला जामीन मंजूर; भावेश भिंडेसह सर्व 5 आरोपी आता तुरुंगातून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement