Pune Shocker: फोनवर जास्त वेळ घालवल्याबद्दल वडिलांनी फटकारले; 19 वर्षीय मुलीने केली आत्महत्या

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृत मुलगी ही इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती व ती एकुलती एक मुलगी होती.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथे 19 वर्षीय तरुणीने घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी ती फोनवर जास्त वेळ घालवल्याबद्दल फटकारले होते. याच रागातून मुलीने टेरेसवरून खाली उडी मारली. मंगळवारी सकाळी मुलीचा मृतदेह जमिनीवर आढळून आला. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृत मुलगी ही इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती व ती एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील व्यापारी आणि आई गृहिणी आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा: Students Committed Suicide: तेलंगणामध्ये इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 6 विद्यार्थ्यांची आत्महत्या

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now