Pune Shocker: फोनवर जास्त वेळ घालवल्याबद्दल वडिलांनी फटकारले; 19 वर्षीय मुलीने केली आत्महत्या
मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृत मुलगी ही इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती व ती एकुलती एक मुलगी होती.
पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथे 19 वर्षीय तरुणीने घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी ती फोनवर जास्त वेळ घालवल्याबद्दल फटकारले होते. याच रागातून मुलीने टेरेसवरून खाली उडी मारली. मंगळवारी सकाळी मुलीचा मृतदेह जमिनीवर आढळून आला. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृत मुलगी ही इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती व ती एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील व्यापारी आणि आई गृहिणी आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा: Students Committed Suicide: तेलंगणामध्ये इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 6 विद्यार्थ्यांची आत्महत्या
19-year-old girl died by suicide after jumping from the terrace of her house at #Ghodegaon in #Pune
By @Pkhelkarhttps://t.co/eeSzd8MNYC
— IndiaToday (@IndiaToday) May 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2023 06:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

