Pune Shocker: हडपसरमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून 63 वर्षीय पुरुषाची आत्महत्या; मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आत्महत्येचा व्हिडिओ
या व्यक्तीने पहिल्या पत्नीच्या निधनानंतर आरोपी महिलेसोबत दुसरे लग्न केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी उघड केले. मात्र, कालांतराने त्यांचे संबंध बिघडले, ज्यामुळे वारंवार भांडणे होत होती.
पुणे शहरात एका 63 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही व्यक्ती हडपसर येथील रहिवासी होता. मालमत्ता आपल्या नावावर हस्तांतरित करण्याची मागणी करणाऱ्या दुसऱ्या पत्नीच्या कथित छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. या व्यक्तीने आत्महत्या करताना स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, यासह त्याच्या मोबाईल फोनमध्ये एक सुसाईड नोट मागे सोडली, ज्यामध्ये त्याने आपल्या पत्नीद्वारे होणाऱ्या छळामुळे, तिच्या वागणुकीमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे.
या व्यक्तीने पहिल्या पत्नीच्या निधनानंतर आरोपी महिलेसोबत दुसरे लग्न केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी उघड केले. मात्र, कालांतराने त्यांचे संबंध बिघडले, ज्यामुळे वारंवार भांडणे होत होती. घरातील अशांत परिस्थितीनंतर व्यक्तीने घर सोडले आणि वेगळे राहण्यास सुरुवात केली, असे अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी त्यांच्या मुलाने पोलिसांत फिर्याद दिली असून, आरोपी महिला पैशासाठी, संपत्तीसाठी आपल्या वडिलांवर दबाव आणत होती आणि मालमत्तेच्या हस्तांतरणाचा आग्रह धरत होता, असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दु:खद घटनेचा तपास सुरू आहे. (हेही वाचा: Latur Accident: लातूरमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; माय- लेकाचा मृत्यू)
Pune : Man Dies By Suicide Due to Harassment From Wife, Records Video Of Suicide In Mobilehttps://t.co/BGeSKQrQJh
— Punekar News (@punekarnews) August 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2023 08:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

