Pune Sadashiv Peth Girl Attack Case: जीवावर उदार होऊन सदाशिव पेठेत कोयता हल्ल्यातून तरूणीला वाचवणार्‍या लेशपाल जवळगे, हर्षद पाटील यांचा राज ठाकरे कडून सत्कार

मायेने विचारपूस केली तसंच त्यांना भविष्यात कोणतीही मदत लागली तर मी आहे, असं म्हणत आश्वस्त केलं.

राज ठाकरे । ट्वीटर

काही दिवसांपूर्वी दिवसा ढवळ्या पुण्याच्या सदाशिव पेठ परिसरामध्ये एका तरूणीवर एकतर्फी प्रेमातून तरूणाने कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेमध्ये मुलीला जीवनदान देण्यासाठी एमपीएससीची परीक्षा तयारीला लागलेले दोन तरूण धावून आले. या दोघांवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी सत्कार केले. दरम्यान काल (4 जुलै) पुण्यात दाखल झालेल्या राज ठाकरे यांनीही लेशपाल जवळगे व हर्षद पाटील यांचा पुणे येथील कार्यालयात बोलावून गौरवण्यात आले. मायेने चौकशी करत  त्यांनी मदतीचेही आश्वासन दिले आहे.  नक्की वाचा: Leshpal Javalge Insta Story: पुण्याच्या सदाशिव पेठेत तरूणीचा जीव वाचवणार्‍या लेशपाल जवळगे याला युजर्स चे DM वर संतापजनक प्रश्न; स्टोरी शेअर करत म्हणाला...! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)