Pune Porsche Crash: दारूच्या नशेत दोन दुचाकीस्वारांचा जीव घेणार्या किशोरवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल ला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
स्वतःच्या मुलाला कायदेशीर कारवाई मधून वाचवण्यासाठी शिवानीने काही पुराव्यांमध्ये छेडछाड केली होती.
दारूच्या नशेत दोन दुचाकीस्वारांचा जीव घेणार्या किशोरवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल ला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात बेदरकारपणे गाडी चालवल्याने दोघांचा मृत्यू झाल्यानंतर स्वतःच्या मुलाला कायदेशीर कारवाई मधून वाचवण्यासाठी शिवानीने काही पुराव्यांमध्ये छेडछाड केली होती. त्यानंतर अटकेत असलेल्या शिवानीला आता सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे.
शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)