Pune Passport Appointments: लवकरात लवकर पासपोर्ट मिळवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय; तत्काळ अपॉइंटमेंट्स 200 पर्यंत वाढवल्या, जाणून घ्या कागदपत्रे

सोमवार, 12 डिसेंबर 2022 पासून पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) पुणे येथे तत्काळ अपॉइंटमेंट्स प्रतिदिन 100 वरून 200 पर्यंत वाढवण्यात येत आहेत.

पासपोर्ट (Image Credits: PTI)

पुणे विभागातील लोकांना त्यांचे पासपोर्ट आता लवकर मिळणार आहेत. परराष्ट्र मंत्रालय आणि पासपोर्ट सेवा सपोर्टच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, पासपोर्ट अपॉइंटमेंट्स आधीच्या तारखेला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी सोमवार, 12 डिसेंबर 2022 पासून पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) पुणे येथे तत्काळ अपॉइंटमेंट्स प्रतिदिन 100 वरून 200 पर्यंत वाढवण्यात येत आहेत. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांनी ही माहिती दिली आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांना एकूण 5 कागदपत्रे तर, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अर्जदारांना 4 कागदपत्रे सबमिट करावी लागलीत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)