Pune New Year Celebration: पुण्याच्या एफसी रोड परिसारात नव्या वर्षाचा जल्लोष, हजारो फुगे उडवत केलं पुणेकरांनी नवीन वर्षाचं स्वागत; Watch Video
राज्यातील विविध मेट्रो शहरात नव्या वर्षाचं जंगी सेलिब्रेशन पार पडलं. पण लक्षवेधी ठरलं ते पुण्याच्या एफसी रोड परिसरातील न्यू इयरचं अनोखं वेलकम.
देशातील विविध शहरांमध्ये नव्या वर्षाचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. त्यात राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या मेट्रो शहरात नव्या वर्षाचं जंगी सेलिब्रेशन पार पडलं. पण लक्षवेधी ठरलं ते पुण्याच्या एफसी रोड परिसरातील न्यू इयरचं अनोखं वेलकम. गुडलक चौकात काल मोठ्या संख्येने तरुणांनी एकत्र येत १२ वाजता हजारो हार्ट शेप फुगे आकाशात सोडले. दरम्यान पुण्याचं अवघं आकाश गुब्बाऱ्यांनी भरलं होत. तरी हा मोहक क्षण पुणे कॅप्चर्स या इंस्टाग्राम धारकाने त्याच्या सोशल मिडीयावर शेअर केला असुन हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram
A post shared by Pune Captures | Pune Food & Travel Blogger (@pune_captures)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2023 09:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

