Pune: चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमावेळी वाजले चक्क NCP चे प्रचारगीत; DJ ला पोलिसांकडून अटक (Watch Video)
पाटील दिवाळीच्या सणावेळी विविध ठिकाणांना भेटी देत होते त्यावेळी, 28 ऑक्टोबर रोजी पुण्यात हा प्रकार घडला.
पुण्याचे पालकमंत्री, भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या एका कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रचारगीत वाजवल्याचा प्रकार घडला आहे. पाटील दिवाळीच्या सणावेळी विविध ठिकाणांना भेटी देत होते त्यावेळी, 28 ऑक्टोबर रोजी पुण्यात हा प्रकार घडला. अशाच एका कार्यक्रमावेळी चंद्रकात पाटील जेव्हा रास्ता पेठेत पोहोचले, तेव्हा डीजेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे टायटल ट्रॅक सुरु केले. हे गाणे ऐकून उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. घडल्या प्रकारावर पोलीस अधिकाऱ्यांनाही डीजेवर तातडीने कारवाई करण्यास भाग पाडले. पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता गाणी वाजवल्याच्या आरोपावरून पोलीस अधिकाऱ्यांनी डीजेला नंतर ताब्यात घेतले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गवळी समाजाने आयोजित केलेला सागर हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी पाटील उपस्थित होते.
WATCH: #BJP's #Pune Guardian Minister #Chandrakantpatil was left red-faced at a public meeting when DJ played the #NCP anthem on his arrival, the DJ was later arrested pic.twitter.com/DeVT8ZaRfU
— Free Press Journal (@fpjindia) October 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2022 10:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

