Pune: भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया- 'ही चूक कितीही वेळा करायला तयार आहोत'

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख चंद्रकांत पाटील, पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि इतर भाजप कार्यकर्त्यांविरोधात, 30 ऑगस्ट रोजी राज्यातील मंदिरे पुन्हा सुरू करण्याच्या मागणीच्या विरोधात झालेल्या आंदोलनाप्रकरणी, कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणतात, 'मंदिरे-प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी आंदोलन केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या आदेशावरून आमच्यावर गुन्हे दाखल केले. मंदिरं सुरु होणे, हा श्रद्धेचा भाग आहेच, पण त्यावर अवलंबून असणाऱ्यांचीही आर्थिक घडी रुळावर यायला हवी, हा आंदोलनाचा उद्देश होता आणि हे चूक असेल, तर ही चूक कितीही वेळा करायला तयार आहोत.'

महापूर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement