Pune Horror: बाणेरमध्ये बिल्डरचा बेसबॉल बॅट आणि काठीने रहिवाशांवर हल्ला; अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)

या वादाचे कारण अजून समजू शकले नाही, मात्र बिल्डरच्या आक्रमकतेमुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने रहिवाशांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुस परिसरातील किर्लोस्कर कंपनीच्या मागे असलेल्या तीर्थ टॉवरमधील रहिवाशांना बिल्डरने मारहाण केली आहे. हा बांधकाम व्यावसायिक सोसायटीच्या रहिवाशांवर बेसबॉल बॅट आणि काठीने हल्ला करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. रहिवाशांनी केलेल्या आरोपानुसार बिल्डरने त्यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचाही प्रयत्न केला. यावेळी शाब्दिक शिवीगाळ आणि धमक्यांनी हाणामारी हिंसक झाली. या वादाचे कारण अजून समजू शकले नाही, मात्र बिल्डरच्या आक्रमकतेमुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा: Pune Shocker: पुण्यातील लवळे-नांदे रोडवर कुटुंबावर 40 जणांचा हल्ला; रॉड, काठ्या, दगड घेऊन केला पाठलाग)

बाणेरमध्ये बिल्डरचा बेसबॉल बॅट आणि काठीने रहिवाशांवर हल्ला-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now