पुण्यामध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे (GBS) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील धायरी येथील 60 वर्षीय व्यक्ती, ज्याला गुइलेन-बॅरे सिंड्रोम असल्याचे निदान झाले होते, त्याचा शुक्रवारी सकाळी पूना रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. अहवालानुसार, या व्यक्तीला बिकरस्टाफ ब्रेनस्टेम एन्सेफलायटीस (BBE) नावाची दुर्मिळ स्थिती होती.एमआरआय आणि स्टूल पीसीआर चाचण्यांनंतर रुग्णाला कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी असल्याचे आढळल्यानंतर, जीबीएसची पुष्टी झाली. हा जीवाणू शरीराच्या मज्जातंतूंवर हल्ला करून रोगप्रतिकारक शक्तीला गोंधळात टाकून जीबीएसला ट्रिगर करू शकतो. या व्यक्तीला 27 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो उपचारांना प्रतिसाद देत होता, मात्र आता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.
आणखी एका प्रकरणात, गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) जीबीएसचे निदान झालेल्या 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या दोन मृत्यूंसह एकूण मृतांची संख्या चार झाली आहे. यासह एकूण संशयित जीबीएस प्रकरणांची संख्या 140 वर पोहोचली आहे. यापैकी 111 रूग्णालयात दाखल आहेत, 45 अतिदक्षता विभागात (ICU) आणि 18 व्हेंटिलेटरवर आहेत. (हेही वाचा: How To Prevent Guillain-Barre Syndrome: जीबीएस आजाराचा प्रसार टाळण्यासाठी काय कराल? पुणे महानगरपालिकेने जारी केली खास मार्गदर्शक तत्त्व)
Pune Guillain-Barré Syndrome:
Pune: 60-Year-Old Dhayari Man Dies Of Suspected Guillain-Barré Syndrome; Death Toll Rises To 4, Total Cases Reach 140#Pune #PuneNews #GBS #GBSOutbreak https://t.co/XdDwcLgukE
— Free Press Journal (@fpjindia) January 31, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)