Pune: टॉवेलने खेळत असताना नकळत लागला फास; 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कात्रज येथील घटना
तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात नेले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
पुण्यातील कात्रज परिसरात एका अल्पवयीन मुलीने घरात टॉवेलने खेळत असताना नकळत गळा आवळून आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अदिती दत्तात्रय कुलकर्णी असे या सात वर्षीय मुलीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी शनिवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास खिडकीच्या ग्रीलला टॉवेल लटकावून खेळत होती त्यावेळी, टॉवेल तिच्या गळ्यात अडकला आणि फास लागला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. घटनेवेळी मुलीची 90 वर्षांची आजी घरात होती. तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात नेले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा: Nanded Accident: नांदेडमध्ये प्रवासी व्हॅन - टॅम्पोची समोरासमोर धडक; 4 जणांचा मृत्यू)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)