Nanded Accident: नांदेडमध्ये प्रवासी व्हॅन - टॅम्पोची समोरासमोर धडक; 4 जणांचा मृत्यू

नांदेडच्या भोकर- नांदेड रस्त्यावरच्या सिताखंडी घाटातील ही दुर्घटना झाली. हा अपघात इतका भयंकर होता की ऑटोचा पुर्णपणे चक्काचूर झाला.

Nanded Accident: नांदेडमध्ये प्रवासी व्हॅन - टॅम्पोची समोरासमोर धडक; 4 जणांचा मृत्यू
Accident (PC - File Photo)

नांदेडमध्ये (Nanded) भोकर- नांदेड रस्त्यावर (Bhokar- Nanded Road)  टाटा मॅजिक आणि विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होवून मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेडमधून एक मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. टेम्पो चालकाचे नियत्रंण सुटल्याने भोकरकडे जाणाऱ्या प्रवाशी टाटा मॅजिकला या टेम्पोने जोराची धडक दिली. समोरा समोर झालेल्या या धडकेत टाटा मॅजिकमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Mumbai Crime: मुंबईत 30 वर्षीय महिलेची ऑटोरिक्षामध्ये हत्या, आरोपी महिलेसह प्रियकर ताब्यात)

मृतांमध्ये भुलाबाई जाधव,संदीप किसवे,संजय कदम,बापूराव राठोड या चार जणांचा समावेश आहे. नांदेडच्या भोकर- नांदेड रस्त्यावरच्या सिताखंडी घाटातील ही दुर्घटना झाली. हा अपघात इतका भयंकर होता की ऑटोचा पुर्णपणे चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच अपघातातील जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातामुळे वाहतुकीमध्येही मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहतुक सुरळित करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भीषण अपघातात चौघांनी जीव गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 08:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).