Pune: नियमांचे उल्लंघन करून कार चालकाने चुकीच्या दिशेने केला लेनमध्ये प्रवेश; PMPML बस चालकाने घडवली अद्दल, व्हिडिओ व्हायरल (Watch)
येरवडा येथील शाहदवल बाबा दर्गा बसस्थानकाजवळील बीआरटी मार्गावर एक कार चालक चुकीच्या दिशेने लेनमध्ये घुसला होता. या बेजबाबदार कार चालकाला पीएमपीएमएल बस चालकाने चांगलाच धडा शिकवला.
पुण्यामध्ये अनेक ठिकाणी शहरातील बसेससाठी वेगळ्या लेन्स आहेत. परंतु ट्राफिकमध्ये अडकलेले कार चालक नियमांचे उलंघन करून अशा बसच्या लेनमध्ये प्रवेश करतात. मात्र असे केल्यानंतर काय घडते, हे एका पीएमपीएमएल बस चालकाने कार चालकाला दाखवून दिले आहे. येरवडा येथील शाहदवल बाबा दर्गा बसस्थानकाजवळील बीआरटी मार्गावर (बसच्या जलद वाहतुकीसाठी बनवलेले मार्ग) एक कार चालक चुकीच्या दिशेने घुसला होता. या बेजबाबदार कार चालकाला पीएमपीएमएल बस चालकाने चांगलाच धडा शिकवला. सुरळीत रहदारी आणि रस्त्याच्या नियमांचे पालन सुनिश्चित करून, बस चालकाने कार चालकाला लेनमधून परत मागे फिरण्यास म्हणजेच रिव्हर्स घेण्यास भाग पाडले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Firing Incident at Badlapur Railway Station: बदलापूर हादरले! रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना, पोलिसांकडून तपास सुरु)
पीएमपीएमएल बस चालकाने कार चालकाला घडवली अद्दल-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)