Pune Car Accident: पुण्यामध्ये वाहन परवाना नसलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटलं गाडी थेट दुकानाला धडकली; अपघाताची घटना कॅमेर्‍यात कैद (Watch Video)

टिळक रोड वर अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाही मात्र 11.52 लाखाच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

Road Accident | Pixabay.com

पुण्यामध्ये अपघाताचा अजून एक प्रकार समोर आला आहे. 19 वर्षीय इंजिनियरिंंगच्या विद्यार्थ्याकडून अपघात झाला आहे. टिळक रोडवर एका 19 वर्षीय तरुणाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण कार अपघात झाला. या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि आजुबाजूच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चालकाकडे वाहनाचा परवाना देखील नव्हता. वेगात असलेल्या वाहनाने दुकानाला धडक दिली आणि शटर तोडले. यामुळे 28 फ्रीज तुटले. एकूण 11.52 लाखाचे नुकसान झाले आहे. यामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यात अजून एक भीषण कार अपघात  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now