Pune Bhide Wada: पुण्यातील भिडे वाडा स्मारकाचा मार्ग मोकळा, गाळेधारकांची याचिका फेटाळली

पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटलांनीही यावर महापालिका आणि पुणेकरांचे अभिनंदन केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं पुण्यातील भीडे वाड्यातील गाळेधारकांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक म्हणून मुलींची शाळा सुरू होणार आहे. पुण्यातील भिडेवाड्या संदर्भातील स्थानिक पोट भाडेकरूंनी पुणे महानगरपालिका आणि राज्यसरकारच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे स्मारकासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून स्मारकाच्या कामाला गती येईल. पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटलांनीही यावर महापालिका आणि पुणेकरांचे अभिनंदन केलं आहे.

पाहा पोस्ट -