Pune Accident: पुण्यातील कर्वे रोडवर क्रेनने चिरडल्याने सायकलस्वाराचा मृत्यू; आरोपीला अटक, तपास सुरु

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कर्वे रोडवर सध्या सुरू असलेल्या फूटपाथ आणि सायकल मार्गाच्या बांधकामामुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे सायकलस्वारांना या ठिकाणाहून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.

Pune Accident

Pune Accident: पुण्यातील कर्वे रोडवर एका अपघातात सायकलस्वाराने आपला जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. आज, 1 जून रोजी कर्वे रोडवरील नळ स्टॉपजवळ झालेल्या या अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू झाला. या ठिकाणी सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास क्रेनने सायकलस्वाराला चिरडले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सायकलस्वर डेक्कनच्या दिशेने जात असताना कर्वे रोडवरील सोनल हॉलसमोर ही घटना घडली. शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कर्वे रोडवर सध्या सुरू असलेल्या फूटपाथ आणि सायकल मार्गाच्या बांधकामामुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे सायकलस्वारांना या ठिकाणाहून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. या अपघाताबाबत डेक्कन जिमखाना पोलीस तपास करत असून, क्रेन ऑपरेटरला ताब्यात घेतले आहे. मृत सायकलस्वाराची ओळख अद्याप पटलेली नाही. (हेही वाचा: Pune Porsche Car Crash: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई Shivani Agarwal हीला अटक, आज न्यायालयासमोर उभे करणार)

पहा पोस्ट- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now