Pune Accident: पुण्यातील कर्वे रोडवर क्रेनने चिरडल्याने सायकलस्वाराचा मृत्यू; आरोपीला अटक, तपास सुरु
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कर्वे रोडवर सध्या सुरू असलेल्या फूटपाथ आणि सायकल मार्गाच्या बांधकामामुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे सायकलस्वारांना या ठिकाणाहून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.
Pune Accident: पुण्यातील कर्वे रोडवर एका अपघातात सायकलस्वाराने आपला जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. आज, 1 जून रोजी कर्वे रोडवरील नळ स्टॉपजवळ झालेल्या या अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू झाला. या ठिकाणी सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास क्रेनने सायकलस्वाराला चिरडले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सायकलस्वर डेक्कनच्या दिशेने जात असताना कर्वे रोडवरील सोनल हॉलसमोर ही घटना घडली. शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कर्वे रोडवर सध्या सुरू असलेल्या फूटपाथ आणि सायकल मार्गाच्या बांधकामामुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे सायकलस्वारांना या ठिकाणाहून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. या अपघाताबाबत डेक्कन जिमखाना पोलीस तपास करत असून, क्रेन ऑपरेटरला ताब्यात घेतले आहे. मृत सायकलस्वाराची ओळख अद्याप पटलेली नाही. (हेही वाचा: Pune Porsche Car Crash: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई Shivani Agarwal हीला अटक, आज न्यायालयासमोर उभे करणार)
पहा पोस्ट-
#Pune: #Crane #Accident Claims Cyclist's Life On Karve Road
Pune, 1st June 2024: An accident occurred near Nal Stop on Karve Road resulting in the death of a cyclist. The cyclist was crushed by a crane around 9:30 AM and died on the spot. The incident took place in front of… pic.twitter.com/vc6R3epdX9
— Punekar News (@punekarnews) June 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2024 01:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

