'मी काय आहे, हे मला गद्दारांनी सांगू नये', प्रियंका चतुर्वेदी यांचे आमदार संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर

ठाण्यातील मेळाव्यात केलेल्या भाषणात प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना माफी नाही, असं म्हटलं होते

Priyanka Chaturvaidi

“आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली”, असं खळबळजनक विधान संजय शिरसाट यांनी केला. हा दावा करताना त्यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचाही उल्लेख केला. यावर आता स्वत: प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. अशी टीका प्रियंका चतुर्वेदींनी केली. त्यांनी ट्वीट करत ही प्रतिक्रिया दिली.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now