Prithviraj Chavan On CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असलेली क्युरेटीव्ह पीटीशन संवैधानिक तरतूद नाही- पृथ्वीराज चव्हाण
मात्र, या उत्तरात त्यांनी उल्लेख केलेल्या अनेक मुद्दे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडून काढले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळात झालेल्या दीर्घ चर्चेला मुख्यमंत्री एकननाथ शिंदे यांनी प्रदीर्घ उत्तर दिले. मात्र, या उत्तरात त्यांनी उल्लेख केलेल्या अनेक मुद्दे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडून काढले आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, इतक्या मोठ्या संखेने मराठा समाजाचे लोक ओबीसीमध्ये आले तर निर्माण होणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल. तसेच, सर्वोच्च न्यायालयात क्युरीटीव्ह पीटीशन दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले असले तरी ती काही संवैधानिक तरतूद नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे समितीचा अहवाल आल्यावर फेब्रुवारीत (2024) निर्णय घेण्याबद्दल मुख्यमत्री सांगतात. म्हणजेच त्यांना राजकारण करायचे आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणूका जाहीर झाल्या, अचारसंहीता लागू झाली तर मग काय करणार? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, CM Eknath Shinde On Maratha Reservation: 'मराठा आरक्षण' विषयावर विधिमंडळात 17 तास 17 मिनिटे चर्चा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर (Watch Video))
व्हिडिओ