Pune Metro Update: पुणेकरांना खूषखबर! जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गिकेचा शुभारंभ 29 सप्टेंबरला होणार

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गिकेचा शुभारंभ व स्वारगेट ते कात्रज (टप्पा- 1) या विस्तारित भूमिगत मार्गिकेचे भूमिपूजन 29 सप्टेंबरला होणार आहे.

Pune Metro Update: पुणेकरांना खूषखबर!  जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गिकेचा शुभारंभ 29  सप्टेंबरला होणार
Pune Metro | X

पुणे शहरात, 26 सप्टेंबरला पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला आणि  जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गावरील पुणे मेट्रोच्या शुभारंभाला देखील पुढे ढकलण्यात आले. पण आता मेट्रो प्रशासनाने या  मेट्रोचा शुभारंभ  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार, 29 सप्टेंबरला होणार असल्याचं जाहीर केले आहे.  मोदी या कार्यक्रमामध्ये व्हर्च्युअली उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान यासोबतच  स्वारगेट ते कात्रज (टप्पा- 1) या विस्तारित भूमिगत मार्गिकेचे भूमिपूजन देखील होणार आहे.

जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक कधी सुरू होणार? 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2024 11:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).