राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी रायगडावर वाहिली छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली (See Photos)
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपतींनी प्रथम होळीच्या माळावरील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दौऱ्याच्या शेवटी त्यांनी शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले तसेच एक डॉक्युमेंटरी फिल्मही रिलीज केली. यावेळी त्यांनी ‘जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, अशा ठिकाणी येणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे,’ असे मत व्यक्त केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)