President Droupadi Murmu Pune Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुणे दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबरला सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद राहणार

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांवर देखील 3 सप्टेंबरला बंदी असणार आहे.

President Droupadi Murmu (pc - X/ANI)

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 सप्टेंबरला पुणे दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आता 3 सप्टेंबरला सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद राहणार असल्याची माहिती यांनी दिली आहे. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत शाळा बंद असतील तसेच पहाटे 00.10 वाजल्यापासून रात्री 24.00 वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई असणार आहे.  यापूर्वी 29 जुलैला त्यांचा पुणे दौरा आयोजित होता मात्र तो पावसामुळे रद्द झाला होता.

राष्ट्रपती पुणे दौर्‍यावर  

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now